युटय़ूबचा रेकॉर्ड, गुगल प्ले स्टोअरवर 10 अब्ज डाऊनलोड

सध्याच्या जमान्यात इंटरनेट गरजेचे साधन झालंय. हातात मोबाईल घेऊन वेगवेगळे व्हिडियो सर्चिंग करण्याकडे तसेच डाऊनलोड करण्याकडे नेटिजन्सचा कल वाढलेला आहे. त्यामुळेच गुगलच्या व्हिडियो स्ट्रिमिंग सर्व्हीस यू-टय़ूबने नवीन रेकॉर्ड केलाय. यू-टय़ूबने स्वतŠचे सर्व रेकॉर्ड तोडून गुगल प्ले स्टोअरवर 10 अब्ज डाऊनलोडचा आकडा पार केला आहे.

यू-टय़ूबव्यतिरिक्त फेसबुक आणि त्याची उत्पादने जगातील सर्वात जास्त डाऊनलोडमध्ये समाविष्ट आहेत. डाऊनलोडमध्ये यू-टय़ूब पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱया क्रमांकावर फेसबुक आहे. फेसबुक आतापर्यंत 700 कोटी वेळा डाऊनलोड केले गेले आहे. फेसबुकचेच दुसरे प्रोडक्ट व्हॉट्सअप तिसऱया क्रमांकावर आहे. व्हॉट्सअप आतापर्यंत 600 कोटी वेळा डाऊनलोड केले गेले आहे. चौथ्या क्रमांकावर फेसबुक मॅसेंजर आहे. ते 500 कोटी वेळा डाऊनलोड केले गेले आहे. इन्स्टाग्राम पाचव्या क्रमांकावर आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या