YouTube वर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची बडबड बंद, कंपनीकडून कठोर कारवाई

Google ने अमेरिकेचे प्रेसिडेंड डोनाल्ड ट्रंप यांचे YouTube अकाउंट ब्लॉक केले आहे. हे डोनाल्ड ट्रंप यांचे अधिकृत अकाउंट होते. काही दिवसांपूर्वी फेसबुक आणि ट्विटरने देखील ट्रंप यांचे अकाउंट बंद केले होते.

ट्विटरने त्याचे अकाउंट रिस्टोर केले असले तरी त्यांना इशारा देखील देण्यात आलेला आहे. ट्रंप यांच्याकडून पॉलिसीचे उल्लंघन झाल्यास त्यांचे अकाउंट नेहमीसाठी बॅन करण्यात येईल. फेसबुकने अनिश्चितकाळासाठी ट्रंप यांचे अकाउंट सस्पेंड केले आहे.

YouTube कडून डोनाल्ड ट्रंप यांचे ऑफिशिल चॅनेल बंद करण्यात आले आहे आणि आता कमीत कमी सात दिवसांपर्यंत ट्रंप यांचे YouTube चॅनेल वरून कॉन्टेंट अपलोड करता येणार नाही.

डोनाल्ड ट्रंप यांच्या अकाउंट वर आता नवा व्हिडीओ दिसणार नसला तरी देखील आधी अपलोड केलेले व्हिडीओ मात्र सहज पाहता येणार आहेत. मात्र YouTube ने जून्या व्हिडीओ खालील प्रतिक्रिया देण्याचा पर्याय हटवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या