गरोदर प्रेयसीला भर थंडीत त्याने विवस्त्र बसवलं, यू ट्युबवर लाईव्ह केलं आणि…

आपल्या गरोदर प्रेयसीला भर थंडीत विवस्त्र बसवणाऱ्या एका विकृत तरुणाला अटक करण्यात आली आहे. स्टॅनिस्लाव रेशेतनिकोव असं या रशियन तरुणाचं नाव आहे. गंभीर म्हणजे आपल्या या विकृत वागणुकीचं यूट्युब लाईव्हही त्याने केलं आहे.

गरोदर प्रेयसीशी विकृतीची परिसीमा

स्टॅनिस्लाव हा यूट्युबवर स्टास रिफ्ले या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्यावर असा आरोप आहे की त्याने आपली गर्भवती प्रेयसी वेलेंटिना ग्रिगोरिवा हिला मॉस्कोच्या शून्य अंश सेल्सिअस इतक्या कडाक्याच्या थंडीत त्याने विवस्त्र बसायला भाग पाडलं. भरीसभर म्हणून त्याने तिच्यावर मिरचीचा स्प्रेही फवारला. भीषण म्हणजे ही कृती त्याने यूट्युबवर लाईव्ह केली.

प्रेयसीच्या नावाने मागितला निधी

स्टॅनिलावने या लाईव्ह व्हिडीओवेळी त्याने प्रेक्षकांना आणि त्याच्या फॉलोअर्सना डोनेशन द्यायचं आवाहन केलं. इतक्या कडाक्याच्या थंडीत विवस्त्र बसल्याने हायपोथर्मिया होऊन गर्भवती वेलेंटिनाचा मृत्यू झाला.

आता होऊ शकते इतकी शिक्षा 

या व्हिडीओनंतर एकच गहजब उडाला. वेलेंटिनाच्या शवविच्छेदनानंतर तिला थंडीमुळे हायपोथर्मियाचा त्रास झाल्याचं आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं. स्टॅनिलावला या प्रकरणी अटक झाली असून त्याला यासाठी कमीत कमी 2 वर्षांची शिक्षा मिळू शकते. सध्या पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करत असून स्टॅनिलाव विरोधात पुरावे गोळा करण्यात येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या