बलात्काऱ्यांची आता खैर नाही, होणार ‘ही’ शिक्षा

80

सामना ऑनलाईन। युक्रेन

लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांची आता खैर नाही. लहान मुलांना आपल्या वासनेचे बळी बनवणाऱ्या या बलात्कारितांना कायमचे नपुसंक करण्यात येणार आहे. बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा यासाठी युक्रेनमध्ये सरकार एक नवीन महlत्त्वपूर्ण कायदा लागू करत आहे. बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना इंजेक्शनव्दारे नपुसंक करण्यात येणार आहे. हा नवीन कायदा लागू होताच बाल लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली दोषी असलेल्या 16 ते 65 वयाच्या व्यक्तींना नपुसंकत्वाचे इंजेक्शन देऊन त्यांचे पुरुषत्वच कायमचे संपवले जाणार आहे.

युक्रेनच्या या निर्णयाचे जगभरात स्वागत करण्यात आले आहे. अमेरिकेतील काही राज्यांमध्ये आधीपासूनच हा कायदा लागू आहे. नुकताच अलाबामामध्येही असाच कायदा लागू करण्यात आला. दोषींना नपुसंक बनवणाऱ्या या इंजेक्शनमुळे व्यक्तीच्या संभोगाच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्याच्या कामेच्छा कमी होत जातात. यामुळे बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना कमी होतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. युक्रेनमध्ये 2017 साली 320 बालकांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. तर युक्रेनमध्ये दिवसाला पाच केसेस या बाललैंगिक अत्याचाराच्या असतात अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यातही निम्म्याहून अधिक पालक समाजात बदनामी होईल या भीतीने मुलावर झालेल्या अत्याचाराची तक्रारच करत नाही असेही पोलिसांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या