पाहा VIDEO महाराष्ट्रात प्लॅस्टिकमुक्तीची गुढी, आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद

22

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्रात येत्या रविवारी गुढीपाडव्यापासून संपूर्ण प्लॅस्टिक, थर्माकोल व त्यापासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी झालेल्या या बैठकीमध्ये याला मान्यता दिली आहे.

या संदर्भात शिवालय, नरीमन पॉइंट येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल आदित्य ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखालील एक विशेष समिती याबाबत स्थापन करण्यात आली आहे. कोणतीही बंदी ही कायमस्वरुपी असू शकत नाही. काळानुसार त्यामध्ये योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखालील समिती या बंदीमध्ये काळानुरुप योग्य बदल कसे करता येईल याचा आढावा घेईल. दर ३ महिन्यानंतर या बंदीचे परीक्षण करण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या