कोकणातील ‘निसर्ग’ग्रस्त कॉलेजांच्या मदतीसाठी युवासेना सरसावली

263

‘निसर्ग’ वादळाचा तडाखा बसलेल्या कोकणातील महाविद्यालयांच्या मदतीसाठी युवासेना सरसावली आहे. युवा सेनेच्या पदाधिकाऱयांनी अधिकाऱयांसह कोकणातील अशा कॉलेजांची पाहणी करून तेथील नुकसानीचा आढावा घेतला.

रायगड जिह्यातील माणगाव येथील टिकमभाई मेथा महाविद्यालय आणि द. ग. तटकरे महाविद्यालय तसेच गोरेगाव येथील दोशी वकील महाविद्यालयाचे वादळामुळे नुकसान झाले आहे. वादळामुळे या कॉलेजांच्या छतावरील पत्रे उडाले आहेत. शिकवणीचे वर्ग, प्रयोगशाळा आणि ग्रंथालयाचे नुकसान झाले आहे.

शिक्षण सह-संचालक डॉ. जगताप, प्राचार्य डॉ. टी. ए. शिवारे, सिनेट सदस्य संजय शेटय़े, युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत व शशिकांत झोरे यांनी या महाविद्यालयांना भेटी देऊन पाहणी केली. या महाविद्यालयांना मदत मिळावी यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या