महावितरणच्या भोंगळ कारभारावर युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव आक्रमक

महावितरणच्या भोंगळ कारभारावर युवासेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव आक्रमक झाले व त्यांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता अतुल गोडबोले यांचा भोंगळ कारभाराबद्दल गांधीगिरी करत शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

बोरी येथील गावकर्‍यांनी आज स्थानिक शिवसेना जनसंपर्क कार्यालयात युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांची भेट घेवून त्यांना महावितरणचा भोंगळ कारभार सांगीतला. एक महिन्याच्या अगोदर आम्ही बोरी येथील सर्व झोपडपट्टी वरील ग्रामस्थानी वर्गणी करुन डिपी बसवली. तरी सुध्दा झोपडपट्टी वरील विद्युत पुरवठा खंडित झाला. याबाबत महावितरणचे कनिष्ठ अभियंता अतुल गोडबोले यांना झोपडपट्टीवरील सर्व ग्रामस्थानी सदर प्रकार सांगितला. तरी सुध्दा त्यांनी कोणतेही पाऊल न उचलता या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामस्थाना यांचा त्रास झाला. यावर युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव आक्रमक होत महावितरणचे कनिष्ठ अभियंता गोडबोले यांना तंबी दिली की, येत्या पाच ते सहा दिवसाच्या आत पुरवठा सुरळीत सुरू नाही झाला तर युवासेना मेहकर तालुक्याच्या वतीने महावितरणच्या कार्यालयास कुलूप ठोकण्यात येईल असा आक्रमक इशारा दिला. यावेळी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या