मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत 10 पैकी 10 जागा जिंकणाऱ्या युवा सेनेच्या विजयी शिलेदारांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सर्वच विजयी उमेदवारांचे उद्धवसाहेबांनी अभिनंदन केले. यावेळी रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, शिवसेना-युवासेना सचिव वरुण सरदेसाई तसेच शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.