ताप उतरला, युवी ठणठणीत

32
yuvraj-singh

सामना ऑनलाईन । लंडन

विराट कोहलीच्या ‘टीम इंडिया’साठी एक खूशखबर आहे. संघाचा आधारस्तंभ असलेला अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग हा तापातून सावरला असून सोमवारी सायंकाळी तो ‘टीम इंडिया’च्या डिनर प्लॅनमध्येही सामील झाला होता.

युवीने त्याची ओळख बनलेली १२ क्रमांकाची कॅप डोक्यावर घातलेली होती. या बारा आकडय़ाचा संबंध युवराजच्या १२ डिसेंबर या जन्मतारखेशी आहे. त्यामुळेच युवीने १२ हा आपला ब्रॅण्ड बनवला आहे. याच युवराजने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणात पाकिस्तानचे बारा वाजवावे ही तमाम हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांची इच्छा आहे. कारण युवी तापातून साकरला असला तरी तो ४ जूनच्या सामन्यात खेळण्याच्या दृष्टीने फिट आहे का याची चाचपणी झालेली नाही. दरम्यान, आजारी युवराजची देखभाल करण्यासाठी त्याची पत्नी हेजलही लंडनमध्ये दाखल झाली आहे. ती युवीसोबतच राहत असल्याने त्याची काळजी घेण्याची ‘टीम इंडिया’ची चिंता दूर झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या