दोन दिवसात कसोटी संपल्यावर युवराजने घेतली फिरकी, ‘तर आज त्यांच्या नावावर हजार विकेट असत्या’

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुलाबी चेंडूने खेळला गेलेला हिंदुस्थान-इंग्लंडमधील कसोटी क्रिकेटचा सामना अवघ्या दोन दिवसात संपल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग ( Yuvraj Singh ) याने नरेंद्र मोदी ( Narendra Modi Stadium ) स्टेडियमवरील पिच हे कसोटीसाठी योग्य नसल्याचं मत नोंदवलं आहे.

पहिल्या डावात इंग्लंडचा संघ अवघ्या 112 धावांत गुंडाळला गेला तर त्यानंतर हिंदुस्थानच्या संघाला पहिल्या डावात 33 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावातही हिंदुस्थानच्या फिरकीपटूची जादू चालली आणि इंग्लंडचा संघ 81 धावात गारद झाला. हिंदुस्थानच्या दुसऱ्या डावात आघाडीचे फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गील यांनी 49 धावांचं लक्ष्य काही वेळात पूर्ण केलं आणि 10 गडी राखत विजय मिळवला. 5 सेशन्समध्येच कसोटी संपली.

यावेळी युवराज सिंगने इशांत शर्माला त्याच्या 100 व्या कसोटीसाठी आणि फिरकीपटू आर अश्विनला ( Ravichandran Ashwin ) 400 बळी पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छाही दिल्या. मात्र त्याआधी तो म्हणाला की, ‘अशी खेळपट्टी आधी असतं तर अनिल कुंबळे आणि हरभजन सिंगच्या नावावर 1000 आणि 800 बळी तरी नक्कीच असते.’

दरम्यान, हिंदुस्थानच्या संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli ) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांनी पिचला दोष दिला नाही. उलट, ‘फलंदाजांनाच खेळपट्टीशी जूळवून घेता आलं नाही.’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“अगदी खरं सांगायचं तर, पिचचा काही प्रश्न नव्हता. माझ्या पाहण्यानुसार बरेच फलंदाज हे स्ट्राइकर चेंडूवर बाद झाले. त्यांच्याच नाही तर आमच्या फलंदाजांनी देखील त्यात अडखळले. पहिल्या डावात आमची फलंदाजी देखील फारशी चांगली ठरली नाही. निदान आपण जेवढे पिच वाईट असल्याचे बोलत आहोत तेवढा पिचचा काही दोष नाही. ते फलंदाजीसाठी देखील चांगलेच पिच होते. एकदा तुम्ही टिकलात की चांगली धावसंख्या उभारता आली असती’, अशी प्रतिक्रिया रोहित शर्माने व्हर्च्युअल प्रेस काँफेरन्समध्ये दिली.

आपली प्रतिक्रिया द्या