युवराज सिंगने दिले निवृत्तीचे संकेत

सामना ऑनलाईन । मोनॅको

हिंदुस्थानचा स्टार खेळाडू युवराज सिंग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. २०१९ सालापर्यंत तो क्रिकेट खेळत राहणार असून त्यानंतर क्रिकेट कारकीर्दीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे दस्तुरखुद्द युवराज सिंग याप्रसंगी म्हणाला. जागतिक क्रीडा पुरस्कारादरम्यान मोनॅको येथे उपस्थित असताना त्याने आपले मत व्यक्त केले.

आयपीएलच्या आगामी मोसमासाठी सज्ज होत असलेला युवराज सिंग पुढे म्हणाला, माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीला मला हिंदुस्थानच्या कसोटी संघात स्थान मिळाले नाही. त्यावेळी टीम इंडियात दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. त्यानंतर मला चान्स मिळाला, पण याच कालावधीत मला कर्करोगाने ग्रासले. त्यामुळे कसोटीत कायमस्वरूपी स्थान टिकवता आले नाही, याची खंत मनात कायम राहील, असेही तो म्हणाला.