दक्षिण आफ्रिकेत ‘ही’ कामगिरी करणारा चहल पहिला फिरकीपटू

सामना ऑनलाईन । सेन्चुरियन

हिंदुस्थाननं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. युजवेंद्र चहल या सामन्याच्या विजयाचा खरा हिरो ठरला. याशिवाय दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेविरोधत ५ विकेट घेणारा तो एकमेव फिरकपटू ठरला आहे. तसेच २२ धावांत ५ विकेट घेत आफ्रिकेत सर्वोत्तम कामगिरी करणारा तो दुसरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या निकी बोयेने २१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानच्या वसिम आक्रमनं १६ धावा देत ५ विकेट घेतल्या होत्या. वसिम अक्रमनंतर एकदिवसीय सामन्यात आफ्रिकेविरोधात चहलची ही दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी आहे. तसेच चहलची ही वैयक्तिक सर्वोत्तम खेळी आहे. कुलदीप यादवनं या सामन्यात ३ विकेट घेतल्या तर भुवनेश्वर आणि बुमराहनं प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या. तर शिखर धवनने सर्वाधिक ५१ धावांची आणि कर्णधार विराट कोहलीनं ४६ धावांची नाबाद खेळी केली. या सामन्यातील विजयानंतर हिंदुस्थाननं ६ सामन्यांच्या मालिकेत २-०नं आघाडी घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या