झाकीर नाईकला मलेशियाचा राजाश्रय

14
zakir-naik

सामना ऑनलाईन । कौलालंपूर

वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रसारक झाकीर नाईक याला मलेशियाचा राजाश्रय लाभला आहे. कट्टर इस्लामवादाला व्यापक पाठिंबा मिळू लागल्याने सरकारनेही त्याला देशात कायमस्वरूपी राहण्यास परवानगी दिलेली आहे. येथील पुट्र मशिदीत पंतप्रधान, मंत्रीगण नमाजासाठी येत असतात. याच मशिदीत झाकीर नाईक हा आला तेव्हा अनेक कट्टरपंथीय मुस्लिमांनी त्याच्यासोबत सेल्फी काढला. मलेशियामधील उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱयांनी त्याला आलिंगन दिले. देशात इस्लामच्या कट्टरवादाला पाठबळ मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या