रहस्यमय ‘ग्यारह ग्यारह’

‘झी 5’ने ‘ग्यारह ग्यारह’ या नव्या वेब सीरिजची घोषणा केली आहे.  या सीरिजमध्ये क्रितिका कामरा, धैर्य कर्वा आणि राघव जुयल महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. ‘पगलेट’फेम उमेश बिश्त यांनी दिग्दर्शित  केलेली आणि पूजा बॅनर्जी व संजय शेखर यांनी लिहिलेली ‘ग्यारह ग्यारह’ची गोष्ट तीन वेगवेगळ्या दशकांत घडते.  त्यात रहस्य, विज्ञान आणि गूढता यांचा अफलातून मिलाफ साधण्यात आला आहे. एक प्रकारे हा फँटसी ड्रामा आहे.

पहिल्यांदाच झी 5 ने करण जोहरच्या धर्माटिक एंटरटेन्मेंट आणि सिख्या एंटरटेन्मेंट यांच्यासोबत  वेब सीरिजची निर्मिती केली आहे.