मिसेस मुख्यमंत्री मालिका प्रदर्शनापूर्वीच ट्रोल

2473

सामना ऑनलाईन । मुंबई

झी मराठी वाहिनीवर मिसेस मुख्यमंत्री ही मालिका प्रदर्शनासाठी सज्ज आहे. त्यापूर्वी वाहिनीने या मालिकेचे टीझर प्रदर्शित केले आहे. या टीझर मध्ये सौ मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर सांडगे वाळत घालताना दिसत आहे, तर एका टीझरमध्ये चक्क मुख्यमंत्र्यांना दळण आणायला सांगत आहे. ही बाब प्रेक्षकांना इतकी खटकली आहे की त्यांनी या मालिकेला ट्रोल केले आहे.

झी मराठी नेमक्या कुठल्या काळात आहे असा सवाल काहींनी विचारला आहे. तसेच मिसेस मुख्यमंत्री एवढ्या मुर्ख असतात का? तसेच हा मुख्यमंत्री 22 वर्षांहूनही अधिक वाटत असल्याचे म्हटले आहे. सांडगे हे छतावर किंवा अंगणात वाळायला घालतात गाडीच मिळाली का? या मालिकेचे टीझर म्हणजे निव्वळ बावळटपणा आहे असेही काही युसर्सजनी म्हटले आहे.

वादळवाट, श्रीयुत गंगाधर टिपरे, आभाळमाया सारख्या मालिका पुन्हा दाखवा पण हे बंद करा अशी मागणीही काही नेटकर्‍यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या