दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगला झी नाटय़ गौरव

मराठी नाटय़सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठत ‘झी नाटय़ गौरव 2023’ पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. या सोहळय़ाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे नीलेश साबळेने सादर केलेले ‘हसवाफसवी’मधील प्रवेश, तसेच या सोहळय़ात प्रेक्षकांना ‘अश्रूंची झाली फुले’, ‘यंदा कदाचित’, ‘सही रे सही’ आणि ‘चारचौघी’ या गाजत असलेल्या हाऊसफुल्ल नाटकांमधील नाटय़प्रवेश पाहता येणार आहेत, तसेच अनेक गोड सरप्राइझेस या नाटय़ गौरवच्या निमित्ताने रसिकांना मिळणार आहेत. तेव्हा एका तिकिटात अनेक प्रयोग पाहण्याची नामी संधी रसिक प्रेक्षकांना असणार आहे. ‘झी नाटय़ गौरव पुरस्कार 2023’ हा सोहळा 9 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता ‘झी मराठी’वर पाहता येणार आहे.