मुंबईत सर्वाधिक युवा उद्योजक, ‘झेप्टो’चा कैवल्य वोहरा कमी वयाचा उद्योजक ठरला

मुंबई शहर सर्वाधिक उद्यमशील युवकांचे शहर ठरले आहे. एवेंडन्स वेल्थ-हुरुन इंडिया अंडर-30 यादी 2025 मध्ये मुंबईतील 15 उद्यमशील युवकांचा समावेश झाला आहे. यादीत 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे 79 नवोदित उद्योजकांचा समावेश आहे. टेक्नॉलॉजी, फायनान्स, हेल्थकेयर क्षेत्रांतील हे युवा उद्योजक आहेत.

उभरत्या उद्योजकांच्या यादीत ‘झेप्टो’चा 22 वर्षीय संस्थापक कैवल्य वोहरा याचा समावेश आहे. कैवल्य वोहरा यादीतील सर्वात कमी वयाचा युवा उद्योजक ठरला आहे. 28 वर्षीय देविका घोलप सर्वात युवा उद्योजिका ठरली आहे. देविका घोलप हिने ‘ऑप्ट्रास्पॅन’च्या माध्यमातून डिजिटल पॅथोलॉजीत नाव कमावले आहे.

  • एवेंडन्स वेल्थ – हुरुन इंडिया अंडर – 30 यादीत 79 पैकी 66 जण पहिल्या पिढीतील उद्योजक आहेत. या सर्वांनी केवळ यशस्वी कंपन्या उभारल्या नाहीत, तर प्रभावशील व्यक्तिमत्त्व अशी ओळख बनवली आहेत. ते 64 हजारांहून अधिक लोकांना रोजगार देत आहेत. 5.2 अब्ज डॉलरहून अधिक इक्विटी फंडिंग उभा केला आहे.
  • उद्यमशील युवकांमध्ये सर्वात लोकप्रिय क्षेत्र सॉफ्टवेअर आणि सर्विस आहे. त्याखालोखाल कन्झुमर गुड्स आणि फायनान्शिअल सर्विस आहे.