चार्ज करा, चार्ज व्हा! मुंबईहून पुणे गाठा!! प्रवास होणार कमी खर्चात

प्रदूषणमुक्त प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातदेखील ई-बसची मागणी वाढली आहे. एव्हरी ट्रान्स लिमिटेड या पंपनीने पुणे ते मुंबईदरम्यान ‘पुरी बस’ नावाने आंतर-शहर बस सेवा सुरू केली आहे. दसऱयाच्या शुभ मुहूर्तापासून या बसच्या नियमित प्रवास फेऱया सुरू झाल्या आहेत. या आंतर-शहर सेवेमुळे लांब पल्ल्याचा, शून्य-उत्सर्जन, ध्वनिप्रदूषणाविना आणि आरामदायक प्रवासाचे स्वप्न आता सत्यात उतरले आहे. ही बस एका चार्जिंगमध्ये 350 किमीपर्यंतचे अंतर पार करू शकणार आहे.

बसची प्रवासी क्षमता 45 इतकी आहे. मन प्रसन्न करणाऱया आकर्षक रंगसंगतीने बसची सजावट करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार केलेल्या या एसी ई-बसमध्ये आरामदायक पुश बॅक सीट आहेत. वाय-फायसह मनोरंजनासाठी बसमध्ये टीव्ही आणि अत्याधुनिक इन्पह्टेनमेंट सिस्टीम आहे. प्रत्येक सीटजवळ एक इन-बिल्ट यूएसबी चार्जर आहे. पाच क्यूबिक मीटर सामान राहू शकेल एवढी डीकी या बसला देण्यात आली आहे. एव्हरी ट्रान्स सुरत, सिल्वासा, गोवा, डेहरादून आदी अनेक शहरांमध्ये यशस्वीरीत्या ई-बस चालवत आहे.