रियाल माद्रीदला धक्का, झिनेदीन झिदानने दिला प्रशिक्षकपदाचा राजीनामा

42

सामना ऑनलाईन । पॅरिस

स्पॉनिश क्लब रियाल माद्रीदला सलग तिसऱ्या वर्षी वर्ल्ड कप जिंकून देणारा प्रशिक्षक झिनेदीन झिदानने आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. झिदानने राजीनाम्याची घोषणा करताच फुटबॉल वर्तुळात जोरदार आश्चर्य व्यक्त केला आहे.

काय म्हणाला झिदान?

‘पुढील वर्षासाठी रियाल माद्रिदचे प्रशिक्षकपद न स्वीकारण्याचा मी निर्णय घेतला आहे. तीन वर्षानंतर मला बदल आणि वेगळ्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे’, असे झिदानने स्पष्ट केले आहे.

चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये रियाल माद्रीदने लिव्हरपूलचा ३-१ ने पराभव केला. ११ वर्षानंतर फायनलमध्ये गेलेल्या लिव्हरपूरला गोलकिपर लोरिस कारियोसच्या खराब कामगिरीचा फटका बसला. रियाल माद्रीदचे हे १३ वे विजेतेपद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या