zomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश

फूड डिलिव्हरी उद्योगात असणाऱ्या झोमॅटोचे आयपीओ नुकतेच आले होते. शुक्रवारी त्याची लिस्टिंगही करण्यात आली. या आयपीओमध्ये पैसे गुंतवणारे अनेकजण मालामाल झाले आहेत. तर पहिल्याच दिवसात 18 जण कोट्यधीश झाले आहेत. या आयपीओची किंमत एका शेअरसाठी 76 रुपये होती. शुक्रवारी लिस्टिंगच्या वेळी त्यात 51 टक्क्यांची वाढ होत त्याची 115 रुपयांवर लिस्टिंग झाली. त्यामुळे यात गुंतवणूक करणारे अनेकजण मालमाल झाले आहेत.

शेअर बाजारात शुक्रवारी झोमॅटोने जबरदस्त वाढ नोंदवत आगमन केले. कंपनीच्या आयपीओला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने शेअर ओव्हर सबस्क्राइब झाला होता. त्यामुळे त्याची लिस्टिंग कशी होणार, याची गुंतवणूकदारांना उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी झोमॅटोने 55 टक्क्यांची वाढ नोंदवली आणि 115 रुपयांना त्याचे लिस्टिंग करण्यात आले.

शुक्रवारी बाजार बंद होताना कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ यांची एकूण संपत्ती 4,650 कोटी रुपयांपर्यंत पोहचली. त्यांची या कंपनीत 5.5 टक्के भागीदारी आहे. इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार कंपनीचे सहसंस्थापक आणि प्रमुख तंत्रज्ञान अधिकारी गुंजन पाटीदार यांच्या शेअरची किंमत 363 कोटी रुपये झाली आहे. तसेच कंपनीचे आणखी एक सहसंस्थापक मोहित गुप्ता यांच्या शेअरची किंमत 195 कोटी झाली आहे..

शेअर बाजारात 115 रुपयांना लिस्टिंग झाल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात शेअरच्या किंमतीत 9 टक्क्यांनी वाढ झाली. बाजार बंद होताना या शेअरची किंमत 125.85 रुपये होती. दिवसभरात शेअरमध्ये तेजी असल्याने याच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे अनेकजण मालामाल झाले आहेत. काही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना कंपनीचे शेअर खरेदी करण्याची संधी मिळते. तसेच काही कंपन्या सॅलकी पॅकेजमध्येच कर्मचाऱ्यांना काही शेअर देतात. त्यामुळे शेअर तेजीत आल्यावर कर्मचाऱ्यांचाही फायदा होतो. झोमॅटेच्या आयपीओला मिळालेला मोठा प्रतिसाद आणि लिस्टिंगनंतर शेअरमध्ये आलेली तेजी यामुळे सध्या झोमॅटो चर्चेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या