रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी 22 मार्चला निवडणूक

रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष आणि अन्य विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी 22 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील रिक्त पंचायत समिती सभापतीपदासाठी 16 मार्च रोजी निवडणूक होणार आहे.

रत्नागिरी जिल्हापरिषद अध्यक्षपदाचा रोहन बने यांनी राजिनामा दिला. त्याचबरोबर शिक्षण सभापती सुनील मोरे, बांधकाम सभापती महेश म्हाप, महिला व बालकल्याण सभापती रजनी चिंगळे, समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव यांनी सभापतीपदाचा कार्यकाल पूर्ण होताच राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष आणि सभापतीपदासाठी 22 मार्च रोजी शामराव पेजे सभागृहात निवडणूक होणार आहे. रत्नागिरी पंचायत समिती सभापतीपदासाठी 16 मार्च रोजी निवडणूक होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या