महाराष्ट्रात पुन्हा शिवसेना-भाजप महायुतीचेच सरकार येणार असून, विधानसभेवर भगवा डौलाने फडकणार आहे. महायुतीला सरासरी 213 जागा मिळतील, असा अंदाज विविध वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंस्थांनी घेतलेल्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) स्पष्ट झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा सुपडा साफ होणार आहे. दरम्यान, हरयाणात पुन्हा भाजपचे सरकार येणार अशी शक्यता आहे. ‘टाइम्स नाऊ’च्या एक्झिट पोलनुसार विधानसभेच्या 288 जागांपैकी शिवसेना-भाजप महायुतीला 230 जागा, रिपब्लिक-जन की बातनुसार 223, सीएनएन न्यूज-18 नुसार 243, एबीपी-सी व्होटर अंदाजाप्रमाणे 204 जागा मिळण्याची शक्यता आहे. विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलच्या सरासरीनुसार शिवसेना-भाजप महायुतीला 213 जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला सरासरी केवळ 61 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचा एक्झिट पोल (जागा- 288) टी.व्ही. चॅनेल शिवसेना+भाजप काँग्रेस+राष्ट्रवादी अपक्ष+इतर रिपब्लिक जन की बात 223 54 11 सीएनएन न्यूज-18 243 41 04 टाईम्स नाऊ 230 48 10 टीव्ही 9 मराठी 197 75 16 इंडिया टुडे ऑक्सिस 166 ते 194 72 ते 90 34 एबीपी माझा सी वोटर 210 63 15 प्रबोधन रिसर्च ग्रूप 199 72 17 हरयाणात पुन्हा भाजप सरकार एक्झिट पोलच्या अंदाजानुसार हरयाणा विधानसभेच्या 90 जागांपैकी भाजपला दोनतृतीयांश बहुमत मिळेल अशी शक्यता आहे.