
महाराष्ट्रात पुन्हा शिवसेना-भाजप महायुतीचेच सरकार येणार असून, विधानसभेवर भगवा डौलाने फडकणार आहे. महायुतीला सरासरी 213 जागा मिळतील, असा अंदाज विविध वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंस्थांनी घेतलेल्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) स्पष्ट झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा सुपडा साफ होणार आहे. दरम्यान, हरयाणात पुन्हा भाजपचे सरकार येणार अशी शक्यता आहे.
‘टाइम्स नाऊ’च्या एक्झिट पोलनुसार विधानसभेच्या 288 जागांपैकी शिवसेना-भाजप महायुतीला 230 जागा, रिपब्लिक-जन की बातनुसार 223, सीएनएन न्यूज-18 नुसार 243, एबीपी-सी व्होटर अंदाजाप्रमाणे 204 जागा मिळण्याची शक्यता आहे. विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलच्या सरासरीनुसार शिवसेना-भाजप महायुतीला 213 जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला सरासरी केवळ 61 जागा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचा एक्झिट पोल (जागा- 288)
टी.व्ही. चॅनेल शिवसेना+भाजप काँग्रेस+राष्ट्रवादी अपक्ष+इतर
- रिपब्लिक जन की बात 223 54 11
- सीएनएन न्यूज-18 243 41 04
- टाईम्स नाऊ 230 48 10
- टीव्ही 9 मराठी 197 75 16
- इंडिया टुडे ऑक्सिस 166 ते 194 72 ते 90 34
- एबीपी माझा सी वोटर 210 63 15
- प्रबोधन रिसर्च ग्रूप 199 72 17
हरयाणात पुन्हा भाजप सरकार
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार हरयाणा विधानसभेच्या 90 जागांपैकी भाजपला दोनतृतीयांश बहुमत मिळेल अशी शक्यता आहे.



























































