साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 25 ऑक्टोबर 2026 ते शनिवार 31 ऑक्टोबर 2026

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलिमा प्रधान

मेष – उत्साह वाढेल

सिंह राशीत गुरूचे राश्यांतर. दिलासा, उत्साह देणाऱया घटना घडतील. उतावळेपणाने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रसंगाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य मिळेल. नोकरीधंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कुणालाही कमी लेखू नका. शुभ दि. 30, 31

वृषभ – नात्यात तणाव होईल

सिंह राशीत गुरूचे राश्यांतर बोलण्या-वागण्यात कोणतीही चूक करू नका. नात्यात तणाव होईल. व्यवहारात फसगत टाळा. नोकरी टिकवा. धंद्यात नियमितपणा ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहनशीलता ठेवा. कायदा पाळा. शुभ दि. 29, 30

मिथुन – तणावाकडे दुर्लक्ष करा

सिंह राशीत गुरूचे राश्यांतर, ऊर्जा देणारे ठरेल. तणावाकडे दुर्लक्ष करा. तुमची कामे वेगाने sरता येतील. नोकरीत परीक्षेचा कालावधी असला तरी यशस्वी व्हाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उत्साह वाढविणाऱया घटना घडतील. शुभ दि. 25, 26

कर्क – चौफेर सावध रहा

सिंह राशीत गुरूचे राश्यांतर संताप वाढविणाऱया घटना घडतील. संयम, सहनशीलता ठेवा. कायदा मोडेल असे कृत्य करू नका. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. धंद्यात आळस नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज वाढवू नका. शुभ दि. 25, 26

सिंह – उतावळेपणा नको

सिंह राशीत गुरूचे राश्यांतर. मानसिक दडपण कमी होतील. विचारांना चालना देणाऱया घटना घडतील. उतावळेपणा करू नका. नोकरीधंद्यात बदल करण्याचा विचार करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रसंगावधान ठेवा. शुभ दि. 26, 29

कन्या – तारतम्य ठेवा

सिंह राशीत गुरूचे राश्यांतर. प्रसंगानुरूप वागा. कोणतेही विधान करताना तारतम्य ठेवा. गैरसमज, तणाव होतील. नोकरीत प्रभाव पडेल. धंद्यात सावधपणे वागा. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ रहा. शुभ दि. 29, 30

तूळ – सावधतेने निर्णय घ्या

सिंह राशीत गुरूचे राश्यांतर. थट्टामस्करी करताना सावध रहा. वस्तू जपा. नोकरीत प्रभाव वाढेल. धंद्यात वाढ होईल. हिशेब तपासा. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संधी मिळेल. गुप्त करवायांना कमी लेखू नका. शुभ दि. 26, 30

वृश्चिक – कायदा मोडू नका

सिंह राशीत गुरूचे राश्यांतर. टिका करताना घाई नको. तणाव, वाद वाढू शकतो. कायदा मोडू नका. नोकरीत सतर्क रहा. धंद्यात अरेरावी नको. कोणताही बदल करण्याची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक आवाज उठवतील. शुभ दि. 28, 29

धनु – घाईत निर्णय नको

सिंह राशीत गुरूचे राश्यांतर. कार्याला, विचारांना चालना देणाऱया घटना घडतील. क्षेत्र कोणतेही असो घाईत निर्णय नको. नोकरीधंद्यात आळस नको. कामाचा ताण जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात यशाची संधी मिळेल. शुभ दि. 26, 30

मकर – कठोर शब्द वापरू नका

सिंह राशीत गुरूचे राश्यांतर. क्रोध, अहंकार हानीकारक ठरेल. कठोर शब्द वापरू नका. कायदाच्या मर्यादा ओलांडू नका. नोकरीत व्याप जाणवेल. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अस्थिरता वाटेल. शुभ दि. 25, 28

कुंभ – कुणालाही कमी लेखू नका

सिंह राशीत गुरूचे राश्यांतर. क्षेत्र कोणतेही असो कुणालाही कमी लेखू नका. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. नात्यात, मैत्रीत नाराजी होईल. वाहन जपून चालवा. कायदा मोडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा राहील. शुभ दि. 30, 31

मीन – वाद वाढवू नका

सिंह राशीत गुरूचे राश्यांतर. उत्साह वाढेल तरीही उतावळेपणाने निर्णय नको. कायदा मोडेल असे काम करू नका. धंद्यात क्षुल्लक अडचणी येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अहंकाराची भाषा नको. जुना वाद वाढवू नका. शुभ दि. 25, 26