असं झालं तर… फ्लाइट मिस झाली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ताबडतोब एअरलाइनच्या सेवा डेस्कवर जा किंवा कस्टमर केअरला कॉल करा, जेणेकरून तुमचे पुढील कनेक्टिंग किंवा परतीचे तिकीट ‘नो-शो’ म्हणून रद्द होणार नाही.

विमानतळावर असाल तर थेट एअरलाइन काऊंटर किंवा ट्रान्सफर डेस्कवर जा. प्रवासात असाल तर लगेच फोनवरून संपर्क करा.

उशीर का झाला हे स्पष्ट व शांतपणे सांगा. काही एअरलाइन्समध्ये ‘फ्लॅट टायर रूल’अंतर्गत किंचित उशीर झाल्यास मदत किंवा रीबुकिंगचा पर्याय मिळू शकतो.

त्याच दिवशी पुढील फ्लाइटवर सीट उपलब्ध आहे का, स्टॅण्डबाय पर्याय आहे का, किंवा बदल शुल्कात सूट मिळेल का ते विचारा.

कनेक्टिंग फ्लाइटमुळे किंवा एअरलाइनच्या चुकीमुळे उशीर झाला असल्यास तसे संबंधितांना लक्षात आणून द्या.