साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 22 नोव्हेंबर 2026 ते शनिवार 28 नोव्हेंबर 2026

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< नीलिमा प्रधान

मेष – प्रकृतीकडे दुर्लक्ष नको
शुक्र राश्यांतर, राहू मकरेत व केतू कर्केत वक्री. अडचणी आल्या तरी, दिलासा देणाऱ्या घटना घडतील. उत्साह वाढेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अरेरावी न करता कामे करा. शुभ दि.25, 26

वृषभ – प्रतिस्पर्धी वाढतील
शुक्र राश्यांतर, राहू मकरेत व केतू कर्केत वक्री. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. यश खेचून आणता येईल. प्रतिस्पर्धी वाढतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. शत्रुत्व वाढवू नका. वरिष्ठांना खुष कराल. शुभ दि. 26, 28

मिथुन – कामाचा व्याप राहील
शुक्र राश्यांतर, राहू मकरेत व केतू कर्केत वक्री. कुणालाही कमी लेखू नका. कायद्याचे पालन करा. अहंकाराचे वागणे त्रासदायक ठरेल. नोकरीत कामाचा व्याप राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वाद, तणाव वाढवू नका. शुभ दि. 22, 23

कर्क – नोकरीत वर्चस्व वाढेल
शुक्र राश्यांतर, राहू मकरेत व कतू कर्केत वक्री होत आहे. क्षुल्लक कारणाने अडचणी वाढतील. चौफेर सावध राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल. नोकरीत वर्चस्व दिसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी स्वीकाराल. शुभ दि. 25, 26

सिंह – सावध भूमिका ठेवा
शुक्र राश्यांतर, राहू मकरेत व केतू कर्केत वक्री. संयम, सहनशीलता ठेवा. कामे करताना चूक होऊ देऊ नका. सावध भूमिका ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया वाढतील. रागावर नियंत्रण ठेवा. शुभ दि. 25, 26

कन्या – प्रकृतीची काळजी घ्या
शुक्र राश्यांतर, राहू मकरेत व केतू कर्केत वक्री. प्रवासात, कामे करताना सावध रहा. दुखापत टाळा. वैर निभावणे कठीण असते तेव्हा सामोपचाराची भूमिका ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे मुद्दे मांडाल. सौम्य धोरण ठेवा. शुभ दि. 25, 26

तूळ – शब्द जपून वापरा
शुक्र राश्यांतर, राहू मकरेत केतू कर्केत वक्री. रेंगाळलेल्या कामांना गती द्या. मोठे यश मिळवा. क्षेत्र कोणतेही असो शब्द जपून वापरा. नोकरीत कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकसंग्रह वाढेल. कठीण कामे करून घ्या. शुभ दि. 23, 26

वृश्चिक – नोकरीत वर्चस्व वाढेल
शुक्र राश्यांतर, राहू व केतू कर्केत वक्री. भावना दुखावतील असे कृत्य, भाष्य टाळा. कठीण कामे मार्गी लावा. नोकरीत वर्चस्व वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सौम्य धोरण ठेवा. चर्चा करा. निर्णयात वेळ घ्या. प्रतिष्ठा राहील. शुभ दि. 25, 28

धनु – सौम्य शब्द वापरा
शुक्र राश्यांतर, राहू मकरेत व केतू कर्केत वक्री. क्षेत्र कोणतेही असो कुणालाही कमी लेखू नका. जवळच्या लोकांना सन्मानाने वागा. नोकरीत सौम्य शब्द वापरा. धंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नम्रता ठेवा. शुभ दि. 23, 27

मकर – प्रवासात सावध रहा
शुक्र राश्यांतर, राहू मकरेत व केतू कर्केत वक्री. प्रकृतीची योग्य काळजी घ्या. प्रवासात सावध रहा. दुखापत टाळा. धंद्यात टिकून रहा. नोकरीत सुधारणा होईल. धावपळ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात घाईत निर्णय नको. शुभ दि. 25, 28

कुंभ – आत्मविश्वास वाढेल
शुक्र राश्यांतर, राहू मकरेत व केतू कर्के वक्री. कठीण, अडचणीत आलेली कामे करून घ्या. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. प्रकृतीत सुधारणा होईल. नोकरीधंद्यात मनाप्रमाणे निर्णय घेता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परिचय होतील. शुभ दि. 26, 27

मीन – महत्त्वाच्या वस्तू सांभाळा
शुक्र राश्यांतर, राहू व केतू कर्केत वक्री. महत्त्वाच्या वस्तु नीट ठेवा. जवळच्या व्यक्तींची मर्जी राखावी लागेल. नोकरीत कामांची गर्दी होईल. धंद्यात आळस नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर लक्ष ठेवा. वाद वाढवू नका. यश खेचा. शुभ दि. 23, 24