
अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत विधान भवन परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी मोहीम राबवून धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान 1 लाख 57 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय विधान भवनजवळ असलेल्या ‘एअर इंडिया’ इमारतीतील रेस्टॉरंट्सवर कारवाई करण्यात आली असून एका ज्यूस सेंटरचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
एफडीएने विधान भवन परिसरातील 13 आणि राज्य सरकारच्या मालकीच्या एअर इंडिया इमारतीतील 15 ठिकाणी तपासणी केली. त्यावेळी स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणाऱया हॉटेल आणि रेस्टॉरंटवर कारवाई केली. विधान भवन परिसरातील कारवाईदरम्यान 67 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर एअर इंडियामधील कारवाईदरम्यान 90 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.























































