
>> नीलिमा प्रधान
मेष – गैरसमज वाढेल
तुळेत सूर्य राश्यांतर, चंद्र बुध युती. तुमच्या क्षेत्रात प्रगतीच्या संधीची वाट पहा. उतावळेपणा, संताप दूर ठेवा. तुमच्याबद्दल गैरसमज वाढेल. कायदा पाळून सर्व कामे करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परिचय प्रेरणादायी ठरतील. शुभ दि. 12, 17
वृषभ – व्यवहारात सावध रहा
तुळेत सूर्य राश्यांतर उत्साहाच्या भरात कोणतीही चूक करू नका. वडीलधाऱयांचा विचार घ्या. व्यवहारात सावध रहा. कायद्याला धरून भाष्य व कृती करा. नोकरीत संमिश्र घटना घडतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. संयम राखा. शुभ दि. 14, 15
मिथुन – प्रगतीची संधी लाभेल
तुळेत सूर्य राश्यांतर, तुम्ही ठरविलेले कार्य वेळेत पूर्ण कराल. प्रगतीची संधी लाभेल. श्रीजगदंबेच्या कृपेची बरसात होईल. नोकरीधंद्यात वाढ होईल. क्षुल्लक कारणाने राग धरू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घ्याल. शुभ दि. 12, 16
कर्क – वाहन जपून चालवा
तुळेत सूर्य राश्यांतर नवरात्र उत्सवात वाद, तणाव, गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. दुखापत टाळा. नोकरीधंद्यात समतोल राखा. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तडजोडीची भूमिका ठेवा. शुभ दि. 14, 15
सिंह – कामांना गती मिळेल
तुळेत सूर्य राश्यांतर. रेंगाळलेल्या कामांना गती देता येईल. वाद, तणाव कमी होईल. प्रयत्नांना यश मिळेल. कायदा मोडेल असे काम करू नका. नोकरीधंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चांगली बातमी मिळेल. शुभ दि. 11, 12
कन्या – नोकरीधंद्यात संधी लाभेल
तुळेत सूर्य राश्यांतर. प्रत्येक दिवस उत्साह, आत्मविश्वास वाढविणारा. श्रीजगदंबेची आराधना एकाग्र मनाने करा. नोकरीधंद्यात संधी लाभेल. नवीन परिचय उपयुक्त ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्व वाढेल. शुभ दि. 12, 14
तूळ – प्रत्येक दिवस पुढे नेणारा
सूर्य राश्यांतर दिलासा देणारे आत्मविश्वास वाढवणारे ठरेल. प्रत्येक दिवस कार्याला पुढे नेणारा ठरेल. जगनमातेच्या आराधनेत मन एकाग्र करता येईल. नोकरीधंद्यात दिलासा मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज संपवा. शुभ दि. 16, 17
वृश्चिक – व्यवहारात सावध रहा
तुळेत सूर्य राश्यांतर. क्षेत्र कोणतेही असो निर्णय घेताना, चर्चा करताना, व्यवहारात सावध रहा. धंद्यात हिशेब नीट करा. जवळच्या व्यक्तीशी नम्रपणे वागा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक आक्रमक होतील. कायदा मोडू नका. शुभ दि. 14, 15
धनु – तणाव वाढवू नका
तुळेत सूर्य राश्यांतर. देवीच्या कृपेने अडचणी दूर होतील. उत्साह वाढेल, मात्र घाई गडबड जपून करा. दुखापत टाळा. नोकरीत तणाव वाढवू नका. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अडचणींवर मात कराल. सावध भूमिका घ्या. शुभ दि. 12, 16
मकर – वेळेला महत्त्व द्या
तुळेत सूर्य राश्यांतर, कार्यपद्धतीची योग्य आखणी करा. वेळेला महत्त्व द्या. जिद्द ठेवा. तुमच्या क्षेत्रात मोठे यश मिळवा. नोकरीधंद्यात मनाप्रमाणे घटना घडतील. उत्साह वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात किचकट प्रश्न सोडवा. योजना पूर्ण करा. शुभ दि. 12, 14
कुंभ – सावध भूमिका घ्या
तुहेत सूर्य राश्यांतर. तुमच्या क्षेत्रातील अडचणी कमी होतील. तरीही सावध भूमिका ठेवा. उत्साहाच्या भरात घाई, गडबड करू नका. विरोधकांना कमी लेखू नका. नोकरीधंद्यात वसुली करा. प्रश्न सोडवाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दगदग टाळा. शुभ दि. 16, 17
मीन – तडजोडीचे धोरण ठेवा
तुळेत सूर्य राश्यांतर. सहनशीलता, संयम, सातत्य ठेवल्यास यश मिळविता येईल. नोकरीत वाद नको. तडजोड करा. भावनेच्या भरात भलते आश्वासन देऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अहंकार नको. चौफेर सावध रहा. कायदा पाळा. शुभ दि. 14, 15






















































