असं झालं तर… मुदतीपूर्वी एफडीचे नूतनीकरण न केल्यास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर कोणी मुदतपूर्तीनंतर फिक्स्ड डिपॉझिट रिन्यू करत नसेल, तर बँका चालू बचत खात्याचा दर देऊ शकतात किंवा त्याच व्याजदराने एफडी अकाऊंट ऑटो-रिन्यू करू शकतात.

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी देशातील बँका जे एफडीचे दर देतात ते तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी एफडी रिटर्न पॅल्क्युलेटर वापरा, व्यावसायिक सल्लाही घेऊ शकता.

एफडी रिन्यू न केल्यास गुंतवणुकीवर अतिरिक्त व्याज मिळविण्यापासून चुकता. यामुळे एकूण उत्पन्नावर मोठा परिणाम होऊ शकतो, व्याज गमवावे लागेल.

जर एफडी ऑटो-रिन्यूवर सेट केली असेल तर बँक/कंपनी प्रचलित व्याज दराने नूतनीकरण करेल, जे सुरुवातीला मिळालेल्या व्याज दरापेक्षा कमी असू शकते.

जर पंपनीच्या मुदत ठेवीवर गुंतवणूकदाराने दावा केला नाही, ती तशीच राहिली तर मुदतपूर्तीची रक्कम थेट गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात NEFT/RTGS द्वारे हस्तांतरित केली जाते.