
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. यातच त्यांचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नानांनी चक्क स्वतःच्या मृत्यूची आणि ‘हार्ट अटॅक’ची भीती व्यक्त केली होती. काही महिन्यांपूर्वी नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याच मंचावरून बोलताना नाना पाटेकर यांनी ‘नटसम्राट’ या अजरामर कलाकृतीबद्दल आणि त्याच्या कलाकारांवर होणाऱया परिणामांबद्दल एक मोठा खुलासा केला होता. ‘नटसम्राट’ची भूमिका रंगमंचावर न करण्यामागचे कारण सांगताना नाना म्हणाले होते, ज्यावेळी मला ‘नटसम्राट’ नाटकासाठी विचारणा झाली त्यावेळी मी स्पष्ट नकार दिला. मी त्यांना म्हटले की, मी नाटक नाही, चित्रपट करेन. कारण नाटक करताना प्रत्येक वेळी त्या भूमिकेत आपला जीव ओतावा लागतो. जर मी ते नाटक केले असते तर मला वाटते 10, 15 किंवा 25 प्रयोगांनंतर मी नक्कीच मेलो असतो. या भूमिकेची तीव्रता किती भयानक असते हे सांगताना नानांनी दिग्गज कलाकारांचे उदाहरण दिले होते. ते म्हणाले, डॉ. लागू, दत्ता भट, चंद्रकांत गोखले, यशवंत दत्त… या सगळय़ा दिग्गजांनी रंगमंचावर नटसम्राट उभा केला. या सर्वांनी भूमिकेत स्वतःला इतके ओतून दिले की, हे सगळेच जण हार्ट अटॅकने गेले. कारण त्या भूमिकेत स्वतःला पूर्णपणे ओतल्याशिवाय प्रेक्षकांना तो आनंद देताच येत नाही. याच भीतीपोटी नानांनी नाटकाऐवजी सिनेमाची निवड केली होती. परंतु नाना पाटेकर यांचाही मृत्यू कार्डियक अरेस्टने दहा वर्षांनंतरच झाला आहे.
निसर्गाच्या कुशीत जगणारा अभिनेता
पुण्यातील डोणजे गावात, सिंहगडाच्या पायथ्याशी असलेले फार्महाऊस त्यांच्या अत्यंत जिव्हाळय़ाचे ठिकाण होते. ‘नानाची वाडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱया या 27 एकरांच्या फार्महाऊसमध्ये ते कुटुंबासह राहत होते. याच ठिकाणी त्यांनी शेतीही सुरू केली होती. प्रसिद्धी आणि झगमगाटापासून दूर राहत त्यांनी कायम साधेपणाला आणि मातीशी असलेल्या नात्याला महत्त्व दिले. हे फार्महाऊस त्यांच्या आयुष्यातील खास ठिकाण होते. शेती आणि निसर्गाच्या सान्निध्यात त्यांनी इथे अनेक निवांत क्षण घालवले. फार्महाऊसची रचना एखाद्या आलिशान सेलिब्रिटी घराप्रमाणे नसून साधी होती.





























































