गौतम गंभीर यांचा अजित आगरकर यांना भावनिक संदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकर यांचा कार्यकाळ अधिकृतपणे संपला आहे. जुलै 2023 मध्ये पदभार स्वीकारलेल्या आगरकर यांचा कार्यकाळ 4 ऑक्टोबरला पूर्ण झाला आणि त्यांनी बीसीसीआयकडे मुदतवाढ न मागण्याची इच्छा व्यक्त केली होती. अजित आगरकर यांच्या निरोपानंतर हिंदुस्थानच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सोशल मीडियावर एक भावनिक संदेश शेअर केला आहे. गंभीर यांनी संघाला प्रथम प्राधान्य देण्याच्या आगरकर यांच्या तत्त्वज्ञानाची आणि त्यांच्या कार्यकाळात हिंदुस्थानने जिंकलेल्या तीन आयसीसी ट्रॉफींची प्रशंसा केली.

गंभीरने यांनी नेमके काय लिहिले?

गंभीर यांनी आगरकर यांचे आभार मानत लिहिले आहे की, ‘प्रिय अजित भाई, तुमच्यासोबत काम करणे हा एक सन्मान होता. तुमच्या कार्यकाळात जिंकलेल्या तीन आयसीसी ट्रॉफी हा सर्वात मोठा पुरावा आहे की तुमची मानसिकता नेहमीच संघाला प्राधान्य देणारी राहिली आहे. मला खात्री आहे की इतिहास तुम्हाला अधिक न्याय देईल. सर्व गोष्टींसाठी धन्यवाद आणि तुमच्या भविष्यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.’

आगरकर यांच्या कार्यकाळात संघाने केलेली ऐतिहासिक कामगिरी

 2023 एकदिवसीय विश्वचषक ः हिंदुस्थानी संघ एकही सामना न हरता अंतिम फेरीत पोहोचला.
 2024 टी-20 विश्वचषक ः हिंदुस्थान अपराजित राहिला आणि टी-20 विश्वचषक जिंकला.
 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी ः हिंदुस्थानी संघाने दुबईमध्ये शानदार कामगिरी करत ट्रॉफी जिंकली.
 2026 टी-20 विश्वचषकः हिंदुस्थानने आणखी एक टी-20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला.