
>> नीलिमा प्रधान
मेष – धंद्यात हुशारी वापरा
चंद्र, बुध प्रतियुती. भावना व चातुर्य यांचा योग्य योग्य मेळ घालून समस्या सोडवा. कायदा मोडेल असे कृत्य नको. नोकरीत दबदबा राहील. धंद्यात हुशारी वापरा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वत:चा कार्याचा भर द्या. टिका करणे टाळा. शुभ दि. 28, 1
वृषभ – कार्याला गती मिळेल
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला अडचणी येतील. त्यानंतर कार्याला गती मिळेल. सहकारी, मित्रांशी वाद टाळा. गैरसमज होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अर्थ सहाय्य मिळवता येईल. शुभ दि. 27, 1
मिथुन – अडचणींवर मात कराल
चंद्र, शुक्र प्रतियुती. महत्त्वाची कठीण कामे करून घेता येतील. क्षुल्लक अडचणींवर मात कराल. आळस करू नका. प्रकृती सुधारेल. नोकरीधंद्यात महत्त्वाच्या घटना घडतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. शुभ दि. 28, 29
कर्क – वेळेला महत्त्व द्या
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस महत्त्वाचा. कामाचे योग्य नियोजन करा. वेळेला महत्त्व द्या. कठीण समस्या मार्गी लावता येईल. नोकरीधंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वैशिष्टय़ूपर्ण कार्य कराल. शुभ दि. 27, 28
सिंह – प्रकृतीची काळजी घ्या
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. हुशारी वापरून कठीण कामे करून घ्या. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. वाद टाळा. नोकरीत टिकवण्यात यश मिळेल. नवीन परिचय होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. शुभ दि. 29, 1
कन्या – प्रगतीची संधी लाभेल
चंद्र, गुरू त्रिकोण योग. कठीण कामे करून घ्या. तुमच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल. नोकरीधंद्यात जम बसेल. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गौरवास्पद कार्य कराल. स्पर्धेत मोठे यश मिळवाल. शुभ दि. 27, 1
तूळ – अहंकार दूर ठेवा
चंद्र, बुध प्रतियुती. मानापमानापेक्षा कार्यावर लक्ष द्या. नवीन ओळख उत्साहवर्धक ठरेल. नोकरी टिकवा. वाद टाळा. अहंकार नको. धंद्यात नम्रता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायदा मोडेल असे कृत्य नको. दूरदृष्टिकोन ठेवा. शुभ दि. 28, 29
वृश्चिक – चौफेर सावध रहा
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. मानसिक, शारीरिक दडपण येईल. नात्यात गैरसमज होतील. चौफेर सावध रहा. योग्य विचार करून निर्णय घ्या. नवीन ओळखीवर विश्वास ठेऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कारस्थाने ओळखा. शुभ दि. 27, 1
धनु – लोकसंग्रह वाढवा
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात सावध रहा. नोकरीत दगदग होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिक काम करा. लोकसंग्रह वाढवा. कायदा मोडू नका. गुप्त कारवायावर नजर ठेवा. शुभ दि. 27, 29
मकर – प्रत्येक दिवस महत्त्वाचा
सूर्य, हर्षल त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस महत्वाचा यश देणारा ठरेल. नियोजनबद्ध कार्य करा. कठीण, किचकट कामे करून घ्या. नोकरीत सुधारणा होईल. धंद्यात वाढ होईल. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उत्साह वाढेल. शुभ दि. 27, 1
कुंभ – कायदा पाळा
चंद्र, शुक्र प्रतियुती. मनावर दडपण येईल. कायद्याच्या चौकटीत राहून काम करा. संयम राखा. धंद्यात अरेरावी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला एकाकी टाकण्याचा प्रयत्न होईल. शुभ दि. 27, 28
मीन – महत्त्वाच्या वस्तू सांभाळा
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस महत्वाचा ठरेल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. जवळच्या व्यक्तींना कमी लेखू नका. नोकरीत यश मिळेल. धंद्यात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनातील गुपित कोणालाही सांगू नका. शुभ दि. 28, 1

























































