मध्य रेल्वेवर दिवाळी आणि सण-उत्सवानिमित्त 418 विशेष गाड्या धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळी आणि इतर सण-उत्सवानिमित्त मध्य रेल्वेवर विविध ठिकाणांदरम्यान 418 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-गोरखपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दैनंदिन विशेष गाड्या (64 सेवा)
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-चेन्नई-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई साप्ताहिक वातानुकूलित विशेष (12 सेवा)
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – श्री एम. विश्वेश्वरैया टर्मिनल बंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी (14 सेवा)
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – लातूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई द्वि-साप्ताहिक विशेष गाडी (26 सेवा)
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (12 सेवा)
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष गाडी (12 सेवा)
  • लोकमान्य टिळक टर्मिनस – मऊ – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष गाड्या (24 सेवा)
  • लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नॉर्थ – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी (12 सेवा)
  • लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगांव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी (14 सेवा)
  • लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष गाड्या (24 सेवा)
  • पुणे – नवीन अमरावती – पुणे साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाड्या (12 सेवा)
  • हडपसर – गाझीपूर सिटी – हडपसर द्वि-साप्ताहिक विशेष गाडी (24 सेवा)
  • हडपसर – गोरखपूर – हडपसर दैनंदिन विशेष गाड्या (64 सेवा)
  • नागपूर – हडपसर – नागपूर द्वी- साप्ताहिक चालवण्यात येणारी विशेष गाडी (26 सेवा)
  • नागपूर – हडपसर – नागपूर साप्ताहिक विशेष गाडी (14 सेवा)
  • कोल्हापूर – कलबुरगि – कोल्हापूर विशेष आठवड्यातून 5 दिवस (शुक्रवार वगळून) (एकूण 64 सेवा)

गाडी क्रमांक गाडी क्रमांक 01079, गाडी क्रमांक 01015, गाडी क्रमांक 01013, गाडी क्रमांक 01105, गाडी क्रमांक 01106, गाडी क्रमांक 01417, गाडी क्रमांक 01418, गाडी क्रमांक 01123, गाडी क्रमांक 01431, गाडी क्रमांक 01201 आणि गाडी क्रमांक 01202 या विशेष गाड्यांचे आरक्षण 27 सप्टेंबर 2026 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

गाडी क्रमांक 01239, गाडी क्रमांक 01240, गाडी क्रमांक 01463, गाडी क्रमांक 01179, गाडी क्रमांक 01051, गाडी क्रमांक 01403, गाडी क्रमांक 01404, गाडी क्रमांक 01415, गाडी क्रमांक 01209, गाडी क्रमांक 01210, गाडी क्रमांक 01451 आणि गाडी क्रमांक 01452 या विशेष गाड्यांचे आरक्षण 28 सप्टेंबर 2026 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.