दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन; चिपळूण, रत्नागिरीसह कोकणातील स्थानकांना थांबे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन 12 विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात शेकडो जादा गाड्या सोडण्यात आल्यानंतर आता दिवाळीतही प्रवाशांसह पर्यटकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तिरुवनंतपुरम सेंट्रल-मदार जंक्शन-तिरुवनंतपुरम सेंट्रल ही ट्रेन साप्ताहिक असेल. तर तिरुवनंतपुरम सेंट्रल-मदार जंक्शन साप्ताहिक विशेष गाडी दर बुधवारी सुटेल. परतीच्या प्रवासात तिरुवनंतपुरम सेंट्रल-मदार जंक्शन साप्ताहिक विशेष गाडी दर शनिवारी सुटेल.

या विशेष गाडीला कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव जंक्शन, थिवी, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पनवेल यांसह विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळीनिमित्त कोकणात येणाऱ्या तसेच कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या विशेष गाड्यांचा लाभ घेता येणार आहे.

विशेष ट्रेनमध्ये एकूण 20 एलएचबी डबे असतील. यामध्ये 2-टियर एसीचा एक, 3-टियर एसीचे चार, 3-टियर एसी इकॉनॉमीचे 13 आणि दोन जनरेटर कारचा समावेश आहे.