गणपती गेले गावाला…चैन पडेना आम्हाला! अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला वाजत-गाजत निरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणपती बाप्पा मोरया.पुढच्या वर्षी लवकर या! गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला.. मंगलमुर्ती मोरया अशा जयघोषात आज अनंत चतुर्दशी दिवशी गणपतीबाप्पांना वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात आज ३६ हजार १७५ घरगुती गणपती आणि ७२ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

आज दुपारनंतर लेझीमच्या तालावर, ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत रत्नागिरी शहरातून मांडवी समुद्र किनाऱ्याच्या दिशेने विसर्जन मिरवणूका निघाल्या.मांडवी समुद्रकिनारी बाप्पांचे आगमन झाल्यानंतर पुजाअर्चा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात गणेशमूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. रत्नागिरी नगरपरिषदेने मांडवी समुद्र किनारी निर्माल्य गोळा करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली होती.समुद्रकिनारी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.