
एका चिमुरडीचा सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ही लहानगी मोठय़ा माणसांप्रमाणे फोनवर बोलतेय. एका वर्षाहून लहान असल्यामुळे तिला नीट बोलता येत नाहीए. मात्र ती मोठय़ांप्रमाणे हातवारे करून, आवाजात चढ-उतार घेत संभाषण सुरूच ठेवतेय. तिच्या चढय़ा आवाजावरून ती फार गंभीर विषयावर बोलत असावी असेच वाटते. एवढीशी चिमुरडी आणि चेहऱ्यावरचे गंभीर हावभाव यामुळे हा व्हिडीओ बघून हसायला येते. या व्हिडीओला अनेकांनी लाईक केले आहे. अनेकांनी या मुलीचे भरभरून कौतुक केले आहे. ‘पलीकडे कोण आहे याची कल्पना नाही, पण संभाषण खूप गंभीर वाटतंय.’ ‘भाऊ विषय गंभीर आहे’ अशा प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. हा व्हिडीओ @saindhavishakya या इंस्टा आयडीवरून शेयर करण्यात आला आहे.



























































