
तेलाला किंवा कढईला आग लागल्यास कढईवर ताबडतोब मेटलचे झाकण किंवा तवा ठेवा, ज्यामुळे ऑक्सिजन मिळणे बंद होऊन आग विझेल. गॅस त्वरित बंद करा.
स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा. यामुळे आग पटकन विझते.
कपडय़ाला किंवा प्लॅस्टिकला आग लागल्यास एखादे सुती कापड किंवा गोणपाट ओले करून त्यावर टाका.
तेलाच्या आगीवर पाणी टाकल्यास आग भडकते आणि तेल उडून संपूर्ण स्वयंपाकघरात पसरू शकते. शक्य असल्यास गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर त्वरित बंद करा.



























































