शांततेने निदर्शने करण्याच्या विद्यार्थ्यांच्या अधिकारांचे न्यायालये रक्षण करणार, सरन्यायाधीश सूर्य कांत यांची स्पष्टोक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांच्या शातोने विरोध करण्याच्या नैतिक अधिकाराचे रक्षण करण्यासाठी न्यायपालिका कटिबद्ध असून याचे उल्लंघन झाल्यास न्यायालये गप्प राहणार नाहीत, असे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी स्पष्ट केले.

पाटणा येथील चाणक्य राष्ट्रीय विधि विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात आज सरन्यायाधीशांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी न्या. सूर्य कांत यांनी  विद्यार्थ्यांसोबत खुली चर्चा केली. कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने सरन्यायाधीशांना शांततेने होणाऱया निदर्शनांवर पोलीस कारवाईवरून प्रश्न विचारला. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले, की विद्यार्थ्यांकडून शांततेने करण्यात येत असलेल्या निदर्शनांवर पोलिसांकडून निर्दयीपणे बळाचा वापर केल्यास न्यायालये गप्प राहणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी न्यायालये कटिबद्ध आहेत.

कॉलेजियममध्ये गोपनीयता आवश्यक

न्या. सूर्य कांत यांना कॉलेजियममधील वेगवेगळी मते सार्वजनिक का केली जात नाहीत, याबाबत एका विद्यार्थ्याने प्रश्न केला. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले, की हेतू कितीही चांगला असला तरीही या गोष्टी उघड केल्यास ज्याच्याबद्दल विचार केला जात आहे ती वक्ती अडचणीत येऊ शकते. कॉलेजियममधील नकारात्मक मतांचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संबंधित व्यक्तीची प्रतिष्ठा जपणे आवश्यक आहे. म्हणूनच कॉलेजियममध्ये गोपनीयता आवश्यक असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले.