राज्यातील 75 टक्के भागांत दुष्काळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृषी आयुक्तांनी खरीप 2026 च्या हंगामाचा आढावा घेऊन राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये म्हणजे राज्यातील 75 टक्के भागांत दुष्काळी परिस्थिती असल्याचा अहवाल सादर केला. त्यानुसार जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये तातडीने दुष्काळी उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत.

दुषकाळी परिस्थितीबाबत प्रथम कळ (ट्रिगर-1) च्या अनुषंगाने 265 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शवणारे छायाचित्र आणि जीपीएस कोऑडीनेट संकलन करून पीक परिस्थितीचा अहवाल तयार करून शेतकऱयांना पीक नुकसानीची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

ठाणे विभाग

श्रीवर्धन, रत्नागिरी  – रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर, सिंधुदुर्ग  ः सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला.

नाशिक विभाग

नाशिक –  मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा, धुळे  ः  धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर, जळगाव  ः एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल, नंदुरबार ः अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी, अहिल्यानगर  ः नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता.

पुणे विभाग

पुणे – भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, सोलापूर ः उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, सांगली ः मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, सातारा  ः सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर, कोल्हापूर  ः पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड.

छत्रपती संभाजीनगर विभाग

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री, जालना ः बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद, बीड ः बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी, लातूर ः लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट, धाराशीव ः धाराशीव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परंडा, उमरगा, नांदेड  ः नांदेड, बिलोली, पंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव, परभणी ः पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी, हिंगोलीः हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत.

अमरावती विभाग

बुलढाणा  ः जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेडराजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा, अमरावती ः अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगावसुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूरबाजार, दर्यापूर, अकोला ः अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी, वाशीम ः वाशीम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा, यवतमाळ  ः यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव.

नागपूर विभाग

वर्धा ः वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी, नागपूर ः नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर, भंडारा ः भंडारा, पवनी, लाखांदूर, गोंदिया ः तिरोडा, चंद्रपूर ः चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णा, गडचिरोलीः गडचिरोली, चामोर्शी.

ठाणे–पालघर जिह्यांचा समावेश नाही

‘ट्रिगर-1’ लागू झालेल्या तालुक्यांमध्ये ठाणे आणि पालघर जिह्यातील कोणत्याही तालुक्याचा समावेश जीआरमध्ये नाही. ठाणे महसूल विभागातील 12, नाशिक विभागातील 49, पुणे विभागातील 35, छत्रपती संभाजीनगर विभागातील 74, अमरावती विभागातील 56 आणि नागपूर विभागातील 39 तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे.