अपूर्व भक्तीची कहाणी – आंदाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंदाळ ही बारा प्रसिद्ध आळवार संतांमधली एकमेव स्त्राr संत. आंदाळ या शब्दाचा अर्थ आहे देवावर सत्ता गाजवणारी. आंदाळ ही इ.स.च्या आठव्या शतकातील तमिळ वैष्णव महिला संत होती. तिची भक्तीची वाट अत्यंत प्रेमाने भारावलेली, एखाद्या कुमारिकेचे निष्कलंक प्रेम असावं असंच जणू. म्हणूनच तामिळ भूमीने तिला श्रीरंगाची प्रिया ‘रंगनायकी’ म्हणूनच गौरविले. 14-15 व्या शतकामध्ये रचल्या गेलेल्या दोन प्राचीन तामिळ काव्यकृतींमधून आंदाळच्या चरित्राचे तपशील पहिल्यांदा समोर आले. दहाव्या शतकापर्यंत तामिळ भूमीवर नयनार व आळवार या संतसमूहांचा उदय झाला. यातील बारा आळवार प्रभाव बरीच वर्षे कायम राहिला. यातीलच आंदाळ ही स्त्री-संत. विष्णूचित्त नावाच्या विष्णूभक्ताला तुळशीच्या बागेत सापडलेली ही तान्ही मुलगी. वडिलांमुळे भक्तीची गोडी लागली आणि रंगनाथाची पूजा तिने मनोभावे स्वीकारली. देवपूजेकरिता गुंफलेला हार ती आधी स्वतच्या गळ्यात घालत असे. पुढे तिच्या माघारी हीच प्रथा आजही रंगनाथाच्या मंदिरात पाळली जाऊ लागली. या मंदिरात आधी आंदाळची पूजा होते व नंतर तिच्या गळ्यातून उतरवलेला हार वाजतगाजत मंदिरात आणून रंगनाथाला अर्पण केला जातो. अशी ही अपूर्व भक्तीची कहाणी!