
झिरोधाच्या प्लॅटफॉर्मवर अवघ्या 28 दिवसांच्या नवजात बाळाच्या नावाने डीमॅट खाते उघडण्यात आले असून हे बाळ आता कंपनीचे आजवरचे सर्वात लहान वयाचा ग्राहक ठरले आहे. नितीन कामथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर ही माहिती शेअर केली आहे.
याआधी बरोबर एक वर्षापूर्वी, 64 दिवसांच्या एका बाळाच्या रूपाने झिरोधाला सर्वात तरुण गुंतवणूकदार मिळाला होता, मात्र यंदा हा विक्रम मोडत वयाच्या अवघ्या 28 व्या दिवशीच चिमुकल्याच्या नावे गुंतवणूक सुरू करण्यात आली आहे. झिरोधाच्या नियमांनुसार, पालक आपल्या अल्पवयीन मुला-मुलींच्या वतीने या खात्याच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. या खात्याद्वारे शेअर्स, म्युच्युअल फंड्स आणि बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करता येते.




























































