
पुणे पोलीस दलातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरात स्वतŠवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औंधमधील नागरस रोड परिसरात बुधवारी दुपारी घडली.
नीलेश भाऊसाहेब पाटील (55) असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सध्या ते विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. पाटील हे अंमलदार होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली होती. सध्या ते विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते.






























































