
इराण आणि अमेरिकेमध्ये गेल्या सात-आठ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात अमेरिकेचे अतोनात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेची जवळपास 81 लढाऊ विमानं, टेहळणी विमानं, हेलिकॉक्टर्स आणि डोन नष्ट झाली आहेत किंवा त्यांचे गंभीर नुकसान झाले आहे. यात अमेरिकेचे सुमारे 3.3 अब्ज डॉलर्सचे (27 हजाह कोटी) नुकसान झाले आहे. अमेरिकेच्या ‘काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिस’ या अधिकृत संस्थेच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे.
इराणसोबतच्या भीषण युद्धात अमेरिकन हवाई दलाची सर्वांत आधुनिक आणि अत्याधुनिक शस्त्रप्रणाली नष्ट झाली आहे, अशी माहिती अमेरिकेच्या वृत्तपत्रांनी दिली आहे. यात एका F-35A स्टील्थ फायटरसह 12 F-15E स्ट्राइक ईगल फायटर जेट्स आणि तब्बल 45 ‘MQ-9 रीपर’ ड्रोनचा समावेश आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
अमेरिकेला सर्वांत मोठा दणका ड्रोनच्या ताफ्यामध्ये बसला आहे. अत्यंत अचूक हल्ल्यांसाठी ओळखले जाणारे 45 MQ-9 रीपर ड्रोन्स इराणने पाडले अथवा नष्ट केले आहेत. एका रीपर ड्रोनची किंमत सुमारे 3 ते 5 कोटी डॉलरच्या घरात आहे. या प्रचंड नुकसानीमुळे अमेरिकेच्या ड्रोन ताफ्यावर मोठा ताण आला असून मोहिमांवरील पकड ढिली झाली आहे.
कुवेतवर फ्रेंडली फायर; 3 फायटर जेट्स भस्मसात
अहवालानुसार, 12 F-15E स्ट्राइक ईगल विमानांपैकी 3 विमाने कुवेतच्या आकाशात एका दुर्दैवी फ्रेंडली-फायर घटनेत पाडली गेली. तर जॉर्डनमधील मुवफॅक साल्टी हवाई तळावर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 8 विमानांचे नुकसान झाले होते; मात्र त्यांना दुरुस्त करून पुन्हा सेवेत दाखल करण्यात आले आहे.
92 दशलक्ष डॉलरचे F-35A स्टील्थ फायटरचेही नुकसान
जगातील सर्वांत प्रगत मानले जाणारे आणि शत्रूच्या रडारला चकवणारे 92 दशलक्ष डॉलर मूल्याचे F-35A लाईटनिंग II हे स्टील्थ फायटर जेटही इराणी गोळीबारात क्षतीग्रस्त झाले आहे. याशिवाय, हवेतच कमांड सेंटर म्हणून काम करणारे 270 दशलक्ष डॉलरचे E-3 सेंट्री हे विशेष टेहळणी विमानही अमेरिकेने गमावले आहे.
नुकसान झालेल्या अमेरिकन लष्करी विमानांची संपूर्ण यादी
12 – F-15E स्ट्राइक ईगल फायटर जेट्स (F-15E Strike Eagle)
1 – F-35A लाईटनिंग II स्टील्थ फायटर (F-35A Lightning II)
2 – A-10 थँडरबोल्ट II लढाऊ विमाने (A-10 Warthog)
7 – KC-135 स्ट्रॅटोटँकर (हवेत इंधन भरण्यासाठी वापरली जाणारी विमाने)
1 – E-3 सेंट्री हवेतील टेहळणी व पाळत ठेवणारे विमान (E-3 Sentry)
2 – MC-130J कमांडो II (विशेष मोहिमांसाठी वापरली जाणारी विमाने)
1 – HH-60W जॉली ग्रीन II (लढाऊ बचाव हेलिकॉप्टर)
1 – MQ-4C ट्रायटन हाय-अल्टीट्यूड ड्रोन
3 – MQ-1 मल्टी-रोल ड्रोन्स
45 – MQ-9 रीपर ड्रोन्स (MQ-9 Reaper Drones)
1 – AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टर (AH-64 Apache)
4 – AH-6 लिटल बर्ड हलकी अटॅक हेलिकॉप्टर्स
1 – MH-60 सी हॉक नौदल हेलिकॉप्टर (MH-60 Sea Hawk)


























































