
राज्यात 27 जून रोजी प्रस्तावित असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटीच्या प्रकारामुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर 27 जून रोजी झालेल्या या पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांचा संताप शांत करण्यासाठी राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यात पुन्हा परीक्षा घेतली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, आता ऑक्टोबर महिना उजाडला असला तरी ना परीक्षा झाली, ना परीक्षेची कोणतीही अधिसूचना आली, असा संताप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी केला.
रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट ‘एक्स’वर तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. आधीच पेपरफुटीचा मोठा फटका राज्यातील तमाम युवा वर्गाला सहन करावा लागत असताना वेळेत पुन्हा परीक्षा घेण्याचे आश्वासन सरकार पाळणार आहे का? की यासाठीही विद्यार्थ्यांना पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार आहे? असे सवाल करत याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
२७ जून रोजी झालेल्या TET पेपरफुटीनंतर सरकारने विद्यार्थ्यांचा संताप शांत करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. परंतु आता ऑक्टोबर महिना उजाडला तरी ना परीक्षा झाली, ना परीक्षेची अधिसूचना आली.
आधीच पेपरफुटीचा फटका राज्यातील तमाम युवा वर्गाला बसत असताना, वेळेत पुन्हा परीक्षा घेण्याचे आश्वासन सरकार पाळणार आहे का? की यासाठीही विद्यार्थ्यांनी आंदोलन करावे लागणार आहे? याचे उत्तर सरकारने द्यावे.
TETच्या विद्यार्थ्यांनीही या अन्यायाविरोधात आवाज उठवत सत्याग्रहाच्या लढ्यात सहभागी व्हावे आणि सरकारला जाब विचारावा!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#MPSCProtest #MPSCPuneProtest #MPSCStudentSatyagraha— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 7, 2026
तसेच टीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही या अन्यायाविरोधात आवाज उठवत सत्याग्रहाच्या या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि सरकारला जाब विचारावा, असे आवाहनही आमदार रोहित पवार यांनी यावेळी केले आहे. परीक्षांच्या वारंवार पुढे जाण्यामुळे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान आणि वाढत्या असंतोषावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

























































