
येमेनमधील इराण समर्थित हुथी बंडखोर आणि सौदी अरेबियातील संघर्ष आता वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य करत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यामुळे विमानतळावरील हवाई वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याची माहिती हुथींच्या लष्करी प्रवक्त्याने दिली आहे.
आमच्या सैन्याने रियाध येथील किंग खालिद विमानतळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने अचूक हल्ला केला आहे. यामुळे विमानतळावरील विमानांची वाहतूक थांबली आहे, अशी माहिती हुथी लष्कराचे प्रवक्ते याह्या सारी यांनी एक्सवर पोस्ट करत दिली.
याशिवाय हुथींनी अदेन येथील अंतरिम सरकारी राजधानीजवळील विमानतळावर, तसेच सौदीच्या खमीस मुशैत लष्करी तळावर आणि आभा विमानतळावर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या सहाय्याने एकाच वेळी हल्ले केल्याचा दावा केला आहे. अदेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि स्फोटकांनी भरलेले ड्रोन डागण्यात आले.
होर्मुझमध्ये जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; 11 हिंदुस्थानी खलाशी जखमी, परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध
अमेरिकेचा इराणला इशारा
गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी इराणने आपल्या अणू संवर्धन क्षमतेत लक्षणीय कपात केली पाहिजे, असा स्पष्ट इशारा अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी दिला आहे. जर इराणला अण्वस्त्रे तयार करायची नाहीत, तर त्यांना 60 टक्के संवर्धित इंधनाची काय गरज आहे? अण्वस्त्र निर्मितीचा कोणताही हेतू नसल्याचे दाखवून देण्यासाठी इराणने प्रत्यक्ष कृती करून आपली संवर्धन क्षमता कमी केली पाहिजे. ही अमेरिकेची मूळ अट आहे, असे ते म्हणाले.
रशियाचा युक्रेनवर पुन्हा ड्रोनहल्ला; हिंदुस्थानी औषध कंपनीचा प्रकल्प उद्ध्वस्त; एकाचा मृत्यू

























































