शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारी निवृत्त कर्मचाऱयाची शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करणाऱया दोघांना उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. त्या दोघांनी सायबर ठगांना बँक खाते पुरवल्याचा आरोप आहे. तक्रारदार एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये जोडले गेले. त्यात कोणत्या शेअरची खरेदी केल्यावर फायदा होईल हे सांगण्यात येत होते. त्यावर विश्वास ठेऊन त्याने 5 कोटी 10 लाखांची गुंतवणूक केली. त्या गुंतवणुकीवर त्यांना एकूण 32 कोटींचा नफा झाल्याचे भासवले. त्यांनी काही रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग करण्याचा प्रयत्न केला. वारंवार प्रयत्न करून देखील ती रक्कम खात्यात वर्ग होत नव्हती. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.