असं झालं तर… सणासुदीमध्ये SIP सुरू करायचीय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन आर्थिक उद्दिष्टे सुरू करण्यासाठी ऑक्टोबर महिना चांगला मानला जातो. सणासुदीत अनेक लोक गुंतवणुकीसाठी SIP सुरू करण्याचा विचार करतात.

जेव्हा शेअर बाजार घसरतो तेव्हा बरेच नवीन गुंतवणूकदार चालू एसआयपी थांबवतात किंवा नवीन एसआयपी सुरू करण्याची योजना पुढे ढकलतात. ही सर्वात मोठी चूक आहे.

बहुतेक लोक एसआयपी सुरू करताना तेच फंड निवडतात ज्यांनी गेल्या 1-2 वर्षांत सर्वाधिक परतावा दिला आहे. फंड निवडताना ट्रक रेकॉर्ड, फंड व्यवस्थापकाचा अनुभव तपासावा.

काही गुंतवणूकदारांना असे वाटते की, ते SIP मध्ये जितका जास्त निधी गुंतवतील तितकी जोखीम कमी. मात्र गरजेपेक्षा जास्त निधी ठेवल्याने पोर्टपहलिओचे ओव्हरलॅपिंग वाढते.

SIP सुरू करण्यापूर्वी किमान 3-6 महिन्यांच्या खर्चाची रक्कम आपत्कालीन निधी म्हणून ठेवावी. इक्विटी एसआयपीचा लाभ 5 वर्षे /दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी आहे.