फ्लाईदुबईच्या धाडसी वैमानिकाच्या कवटीला दुखापत; सौदीमध्ये तातडीची शस्त्रक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फ्लाईदुबईचे विमान पाडण्याचा प्रयत्न हाणून पाडताना हिंदुस्थानी वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्या हल्ल्यादरम्यान कवटीला फ्रॅक्टर झाले आहे. हल्ल्यादरम्यान मच्छार यांच्या कवटीचा काही भाग आतल्या दिशेने दबला गेला. यामुळे सौदी अरेबियामध्ये त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर त्यांना विमानाने संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे हलवण्यात आले आहे.

पुढील वैद्यकीय उपचारांसाठी गेल्या आठवड्यात कॅप्टन मच्छार यांना सौदी अरेबियातून अबू धाबीला हलवण्यात आले. त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिथे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. मच्छार उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे सूत्रांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी कॅप्टन मच्छार यांच्या कुटुंबीयांना रुग्णालयात त्यांना भेटण्याची परवानगीही दिली आहे.

बुधवारी पहाटे दुबईहून तेल अवीवकडे जाणारे फ्लायदुबईचे विमान FZ1073 प्रवासाच्या अडीच तासांनंतर सुमारे 18,000 फूट खाली कोसळले. विमान हायजॅक झाल्याचे दर्शवणारा code squawk 7500 सक्रिय करण्यापूर्वी, वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सना आपत्कालीन संदेश पाठवला होता. ओमानचे सह-वैमानिक हमद अल-हम्मामी यांनी मच्छर यांच्यावर चाकूने वार केले होते आणि त्यानंतर विमानाचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता.