
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. 20 रुपयांच्या मोमोजच्या वादातून दुकानदाराने विद्यार्थ्यावर उकळते तेल फेकले. यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेत आहेत.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, ग्वाल्हेरच्या ओल्ड रेशम मिल चौकात ही घटना घडली. चेतन भदोरिया असे पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. चेतन त्याच्या मित्रांसोबत आरोपी अंकितच्या मोमोजच्या दुकानात मोमोज खाण्यासाठी गेला होता. त्याने 20 रुपयांचे मोमोज घेतले. मात्र मोमोज कमी दिल्याने त्याने आरोपीकडे याबाबत विचारणा केली. यावरून आरोपी आणि चेतनमध्ये वाद झाला. आरोपीने शिवीगाळ केल्याने वाद आणखी वाढला. यानंतर आरोपीने कढईतील गरम तेल चेतनच्या अंगावर फेकले. या चेतनचा चेहरा आणि कान गंभीर भाजले.
घटनेनंतर आरोपीने आपली गाडी सोडून पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांनी घनटास्थळी दाखल होत पुढील कारवाई सुरू केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.


























































