असं झालं तर… प्राप्तिकर विभागाची नोटीस आली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्यास घाबरून न जाता सर्वप्रथम इन्कम टॅक्स पोर्टलवर लॉग इन करून ‘e-Proceedings’ मध्ये नोटीस खरी असल्याची खात्री करा.

नोटिसीवरील कारण आणि कलम (Section) काळजीपूर्वक वाचा. AIS आणि Form 26AS मधील आकडेवारी तुमच्या आयटीआरशी तपासा.

चूक असल्यास 30 दिवसांच्या आत सुधारित (Revised) आयटीआर भरा. पोर्टलद्वारे ऑनलाईन स्पष्टीकरण किंवा उत्तर सादर करा.

Document Identification No. द्वारे नोटीसची वैधता तपासा. बँक स्टेटमेंट, आणि इन्व्हेस्टमेंट प्रूफ तयार ठेवा. नोटीसना 30 दिवसांच्या आत उत्तर देणे बंधनकारक असते.

कलम 143 (1)(ए), 139(9), 142(1) यांसारख्या नोटिसेसना ई-फायलिंग पोर्टलवरून विहित मुदतीत ऑनलाइन उत्तर देऊन किंवा त्रुटी सुधारून दंडापासून वाचता येते.